उच्चशिक्षित व खोऱ्याने पैसा ओढणारी नवी तरुण पिढी ही फक्त इस्लामी दहशतवादांतच सध्या पहायला 
मिळालेली आहे असे दिसून येते.  हिंदू,  शीख,  जैन उच्चशिक्षित आणि चांगला पगार मिळवणारी नवी पिढी धर्म 
शिकवणी झुगारून देऊन पाश्चात्य विचारसरणी जवळ करताना दिसतात.  पाहा, कॉल सेंटर व आयटी क्षेत्रातील 
तरुण. 

या मुद्द्याशी असहमत आहे. माझा काही वर्षे - मित्रामार्फत - बजरंग दलाशी जवळचा संबंध होता. दीपक गायकवाड, शरद गोयकर वगैरे व्यक्तींना अनेकदा भेटलो होतो. (हे लोक देखील उच्चशिक्षित आहेत.)  'बजरंग दल पुणे जिल्हा संघटक' या पदावर माझा लंगोटीमित्र अनेक वर्षे होता. त्याने बीकॉम पूर्ण करून एम कॉम ला प्रवेश घेतला होता. त्याची आई आमच्या मतदारसंघाचे दोन वेळा (काँग्रेसतर्फे) प्रतिनिधित्त्व करून आलेली होती. भरपूर पैसा आणि पुरेसे शिक्षण असूनही बजरंगी विचारसरणी त्याला जवळची का वाटावी हे मला समजले नाही. (सध्या लग्न वगैरे होऊन एक मुलगी झाल्याने आता तो पुन्हा माणसांत आला आहे. घरगुती झाला आहे. कपाळावर भगवी उभी दांडी काढायच्या ऐवजी गोपीचंदनाचा गोल टिळा लावतो. नियमित दाढी करतो. बजरंगी शेंडी कापून कंगव्याने केसबिस विंचरतो.  आईची काँग्रेसमध्ये असलेली ओळख वापरून पंचायत समिती सदस्यत्वासाठी प्रयत्न करण्याचा विचार आहे. )   

सनातन प्रभात या संघटनेशी संबंधित असलेले अनेक तरूण हे रूढ अर्थाने सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहेत.


मात्र इस्लामची शिकवण ही एका अर्थाने देश या संकल्पनेशी विसंगत आहे. कुरुंदकरांनी (बहुदा भजन या ) एका पुस्तकामध्ये भारतात राष्ट्रीय शिक्षण घेतलेले मुसलमान हे अधिक कडवे आणि आग्रही असतात हे सोदाहरण स्पष्ट केले होते. मुसलमानांच्या फुटीरतावादी चळवळीला अलिगढ विद्यापीठातून खतपाणी मिळत गेले. अशिक्षित आणि गरीब मुसलमानांपेक्षा हे सुशिक्षित, श्रीमंत मुसलमान हिंसक आणि धर्मवेडे होते. त्यामुळे श्रीमंत आणि सुशिक्षित दहशतवादी ही कल्पना 'सध्याची' नाही. ती फार पूर्वीपासूनची आहे.

सध्या संदर्भासाठी पुस्तक जवळ उपलब्ध नसल्याने आठवेल तसे लिहिले आहे. चू.भू.द्या.घ्या.