फ्लॉवरच्या भाजीपेक्षा त्याचं इतर काहीही छान लागणारच!
फ्लॉवर उपवासाला चालतो ही माहिती नवी आहे. मात्र चांगली पटावीशी आहे. हा खाद्यप्रकार साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा अधिक नैसर्गिक आणि म्हणूनच उपवासाला चालायला अधिक लायक आहे. (अर्थात, खिचडी उपवासाव्यतिरिक्त केव्हाही चालेल! )
शिवाय उपवासाला दुप्पट खाशी न करता असे काही मोजके आणि हलके खाऊन पोटाला आराम मिळेल हा फायदा आहेच!
एरव्ही देखील डाएट फूड म्हणून हे उत्तम आणि चविष्ट आहे.
हे लक्षात घेता याला खरं तर सात्त्विक फ्लॉवरच म्हणायला हवं