मागील भागात पाहिल्याप्रमाणे प्रत्येक राज्याला लोकसंख्यानिहाय/लोकप्रतिनिधीनिहाय मतांचे 'वजन' असते. तसेच प्रत्येक राज्याचे नागरीक प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षासाठी मतदान न करता औपचारीकपणे ही पदे निवडून देणाऱ्या प्रतिनिधींसाठी मतदान करतात. हे प्रतिनिधी मग औपचारीकपणे राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्षाची निवड करतात. या प्रतिनिधींचे मिळून इलेक्टोरल कॉलेज बनते, अशी जुजबी माहिती मला आहे. याबद्दल अधिक विस्ताराने लिहू शकाल काय?

तसेच स्विंग स्टेट म्हणजे काय? त्याचे निवडणुकीतील महत्त्व काय? इ. बद्दलही विस्ताराने लिहू शकाल काय?