'आत्या'चा उच्चार कधीकधी ('त्' दोनदा आल्यासारखा) 'आत्त्या' असाही करतात. 'आत्या' हा मराठी शब्द असूनही.
तसा 'सूर्य'चा उच्चार होत नाही. 'सूर्य'च्या उच्चारात 'र्' एकदाच येतो. 'सूर्र्य' असा उच्चार होत नाही.
'सूर्य'चा उच्चार आणि 'कार्य'चा उच्चार पाहा. आपल्याला फरक जाणवेल. 'कार्य'चा उच्चार हा काहीसा 'कार्र्य'कडे झुकणारा वाटतो पण 'सूर्य'चा 'सूर्र्य'कडे झुकत नाही.