मला - जेव्हापासून कवितांचे गण, वृत्त इत्यादी समजू लागले, तेव्हापासून - असं वाटायचं, की जर कविता केली तर ती नियमबद्धच केली पाहिजे. (अर्थात, कविता करीन असं माहित नव्हतं तेव्हा!) त्यामुळे, जेव्हा कविता केली, तेव्हा, साहजिकच यमक जुळविण्याचा प्रयत्न केला.

सुनीत या काव्यप्रकाराबद्दल मला खूप उत्सुकता होती, आणि अजूनही आहे. म्हणून एक सुनीत लिहिण्याचा प्रयत्न केला. कितपत जमला, ते माहित नाही, पण, लगेच इतरांना दाखवण्याची घाई मात्र केली!

सुनीत लिहायचं म्हणून यमकंही तशीच जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, सुनीत या काव्यप्रकाराची आणखीही काही वैशिष्ट्ये असतील; पण मला (कदाचित) माहित नसल्याने, कविता सुनीत वाटणार नाही. पहिलाच प्रयत्न आहे. पुढील वेळी सुधारणा नक्की!