माझ्या नावाबद्दलचा प्रश्न मला अपेक्षितच होता. पण, नावाचा खुलासा करण्याआधी, मन:पूर्वक आभार.
(पुढच्यास ठेच मागचा शहाणा सारखे मला ठेच मी शहाणा असे सुचवता की काय? कृपया ह. घ्यावे. )
हा हा हा!! चांगला विनोद - खरोखर.
पण, बर्याच वेळा असं होतं, की आपण ठेच लागल्यावरच शिकतो! म्हणून तसे शब्द वापरले.
'घुग्गू' हे विचित्र नाव घेण्यामागे तसे काही खास कारण नव्हते. जेव्हा नेट वर सुरुवात केली, तेव्हा असं वाटायचं, की आपलं खरं नाव देण्यात (काहीतरी) धोका आहे! म्हणून "सीक्रेट" नाव घेतलं. पण त्यानंतर लक्षात आलं की ही निरर्थक भीती आहे.
आता जरी खरं नाव सांगणार असलो, तरीही "सीक्रेट" नावच कायम ठेवायचं आहे. (मजा वाटते ना!)
माझं खरं नाव अजिंक्य नरेंद्र गोळे.