सुरंगा हे नाव पहिल्यांदाच ऐकले. अर्थात प्रत्यक्ष छायाचित्र पाहिल्यावर कवितेतील ओळींची खऱ्या अर्थाने अनुभूती आली.

......., पुन्हा बंधनातून, पुन्हा मीच होऊन, ......या ऐवजी,

....., पुन्हा बंधनातुन, पुन्हा मीच होउन, ..... असं नाही का चालणार? इथे ऱ्हस्वाचे दीर्घ करून मात्रा जुळवल्या आहेत. ( मी आपला प्रयत्न केला, चूकभूल द्यावीघ्यावी. )

मात्र कविता सुंदर. फूल कधीही पाहिलेले नसूनही, छान अनुभव आला. पुलेशु.

आपला - अजिंक्य.