माणसाला जनावरपेक्षा ही खालची वागणूक देणारा हिंदू धर्म

गेल्या १ हजार वर्षात असे घडले असावे मात्र मूळ हिंदुधर्म जन्माधारित जातीयवादाचा पुरस्कार 
करणारा नाही.  कारण गीतेच्या चौथ्या अध्यायात १३ व्या श्लोकात श्रीकृष्ण स्वत: म्हणतो की ह्या 
चातुर्वणाची निर्मिती मी स्वत: माणसाचा स्वभावधर्म व कर्मानुसार
 केली आहे. 

हिंदू धर्म माणसाला जनावरापेक्षा खालची वागणूक देणारा होता ह्यात काहीही अतिशयोक्ती नाही. अगदी कालपरवापर्यंत "खालच्या" जातीतल्या लोकांना सवर्णांचा 'मैला' डोक्यावर ओढून नेताना मी स्वतः पाहिले आहेत. जात बघून चहाचे कप, पिण्याचा पेला बदलणारे नातेवाईकही बघितले आहेत.  ह्याशिवायही अनेक उदाहरणे देता येतील. चातुर्वर्ण्य हे कर्म आणि स्वभावधर्मानुसार आहे, असे म्हणणे आणि मानणे भंपकपणा आहे किंवा भाबडेपणा तरी आहे.


माझ्या दोन नवबौद्ध घनिष्ठ मैत्रिणी होत्या जाधव व ठोकळे आडनावाच्या.  त्या एकमेकींशी बोलत नसत.  
मला आश्चर्य वाटे.  मी विचारल्यावर एकदा जाधव मला म्हणाली की आम्ही चांभार बौद्ध व ठोकळे महार 
बौद्ध म्हणून मी तिच्याशी बोलत नाही. आमच्यात रोटी बेटी व्यवहारपण होत नाहीत.

एवढेच कशाला सोमोस आणि बावने ह्या महार जातीतल्या पोटजातीतदेखील रोटीबेटी व्यवहार होत नसे. अजूनही अनेक जण करत नाहीत. असो. तूर्तास एवढेच.