इतर लेखनापेक्षा ही कथा थोडीशी कमी पडली (असे मला तरी वाटले) .

कथेला थोडीशी संथ लय असायला पाहिजे होती. केवळ संवादांमधून कथा उलगडण्याचा प्रयत्न चांगला आहे मात्र प्रसंग फार वेगवान चित्रित केले आहेत त्यामुळे कोणताही प्रसंग रेंगाळायला, प्रभाव पाडायला वेळ मिळत नाही. अशा कथांमध्ये संवादांची लांबी थोडी अधिक असावी जेणेकरून वाचकाला त्यात इन्व्हॉल्व्ह(! )होता येईल.

अर्थात समकालीन वातावरण, प्रसंग, अडचणी, मनोविकार यांवर तुम्हाला लिहावेसे वाटते याचे कौतुक आहे. पु. ले. शु.