बर्टॉल्ट ब्रेख्तच्या एपिक थिएट्रिकल शैलीचा हा प्रकार आहे का? ड्रॅमॅटिक थिएटर (आपले नेहमीचे) आणि हे एपिक थिएटर मध्ये फरक असा सांगतात की, पहिल्यात प्रेक्षक पात्रांशी समरूप होणे अपेक्षित असते तर दुसऱ्यात तो तसा न होणे - एखाद्या न्यायाधीशाच्या किंवा ज्यूरीच्या भूमिकेतून कोर्टातले युक्तिवाद पाहिल्याप्रमाणे पाहणे अपेक्षित असते. त्यामुळे त्यातली पात्रे स्वतःच्या अंतःकरणातून न बोलता आपण करीत असलेल्या भूमिकेतील पात्राची बाजू वकिलाप्रमाणे मांडण्याच्या शैलीत अभिनय करतात.
मला जेवढे आठवले तेवढ्यावरून असे वाटले. चू. भू. द्या. घ्या.