आवडला. मुद्देसूद आणि पटणारा आहे.
नालंदा येथील ग्रंथ जळाले हे खरे. परंतु अनेक विद्वानांचा नालंदा नाव पुढे करून ते जळले आणि सर्व ज्ञान नाहीसे झाले म्हणण्याकडे कल असतो. नालंदा बांधले गुप्त काळात म्हणजे सुमारे इ. स. ४-५०० समजू. विद्यापिठात अनेक प्रकारचे किंवा सर्वप्रकारचे शिक्षण देण्यात येत असे. म्हणजेच, जे विद्यार्थी शिकून बाहेर गेले त्यांच्याद्वारे ज्ञानप्रसारही झाला असण्याची शक्यता मोठी आहे. ज्ञान हे काही ग्रंथालयाच्या चार भिंतींआड दडून राहू शकत नाही. या अनुषंगाने त्या ज्ञानाचा वापर नंतर कधी झाल्याची नोंद सापडत नाही हे खरेच किंवा ज्ञान जर चार भिंतींतच राहत असेल तर त्या ज्ञानाचा खुद्द त्या काळातही काहीही उपयोग नसतो हेच खरे.
नालंदा विद्यापीठ जाळले असावे खिल्जी राजवटीत सुमारे १२ व्या शतकांत तेव्हा सुमारे ५-६०० वर्षांहून जास्त कालावधीतील ज्ञान ग्रंथालयात पडून एके दिवशी जळून गेले म्हणण्याला फारसा अर्थ नाही.