तुमच्या भावना मनापासून पटल्या. पण ''माणसाला दररोज खायला का लागतं?" हा प्रश्न थोडा बदलून "माणसाला दररोज चवीचं खायला का लागतं?" असा करायला हवा. भूक तर प्राण्यांनाही लागते. पण ते ना फोडण्या करतात, ना कणिक भिजवतात. हे सगळे आपल्या जिभेचे चोचले, दुसरं काय! यालाच प्रतिष्ठीत भाषेत 'खाद्य-संस्कृती' म्हणतात ;) आणि 'संस्कृती जपणे' ही गोष्टच आपल्याला प्राण्यांपासून वेगळे करते ना?