सुरंगा या नावाचं खरंच फूल आहे हे मलाही माहित नव्हतं. या माहितीबद्दल धन्यवाद चक्रधर.
वस्तुतः ही कविता मला गणेशवेलीच्या लालभडक फुलाकडे पाहून सुचलेली होती. पण सुरंगा शब्द अगदीच फूल या अर्थाने वापरलेला राहिला नाही. त्याचा अर्थ जरा बदलत गेलाय शेवटी शेवटी.
आजानुकर्ण, सुरंगा हा शब्द संबोधन नसून सुरंगा या स्त्रीलिंगी शब्दाची प्रथमा आहे. त्याचा अर्थ येहे सुंदर रंगाची एवढाच अभिप्रेत आहे. आणि वर म्हटल्याप्रमाणे त्याचा अर्थ बदलत गेला आहे पण तो तसा इतरत्र आहे की नाही याचीही मला कल्पना नाहीये.
.....फुटे बंधनातून ..... मीच होऊन या ओळींची रचना मराठी बोली उच्चारांप्रमाणे केलेली आहे. म्हणजे शेवटचा अकार न उच्चारता. उदा. बंधनातून (= उच्चारी बंधनातून्). याप्रमाणे
विंदा करंदीकरांनी कवितेत हा प्रकार खूप वापरलाय. मला तो खूप जवळचा वाटतो. शिवाय मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे असा उच्चार तो कवितेत लोभस सुद्धा वाटतो.
कधी कधी आशयाच्या प्रामाणिक अभिव्यक्तीला जर छंदामुळे आडकाठी येणार असेल तर कट्टर छांदिष्टांनी आशयाशी तडजोड करावी असं म्हटलं असलं तरी आशयासाठी छंदाशी खेळ करावा असं मला तरी वाटतं.