आई माझी म्हणजे सगळ्यान्शी आपणहून ओळख करून घेणारी.. लगेच आईने मुद्याला हात घातला. पहिला प्रष्ण "काय आडणाव तुमचे? "( इथे उद्देश जात विचारण्याचा होता हे काही सांगायला नको... मराठी लोकाना सवय असते नाही ).

लग्नात मंगल सेवा देणारे तर उघड विचारतात जात काय तुमची. मग समजा कोणी म्हटले 
की आम्ही कोकणस्थ मराठा की लगेच ते त्या पावतीवरच नोंद करतात, हिरवी मिरची, ओले 
खोबरे, गरम मसाला आणि वाटण. समजा कोणी म्हटले की आम्ही खानदेशातील वाणी की 
लगेच ते पावतीवरच नोंद करतात, शेंगदाणे, सुके खोबरे, खानदेशी मसाला इ. इ.  

त्यात सेवा देणाऱ्यांना आणि घेणाऱ्यांना काही विशेष वाटत नाही.  

मला स्वत:ला मात्र हा प्रश्न विचारायला आणि विचारलेला अजिबात आवडत नाही. जनगणनेच्या 
वेळची गोष्ट. माहिती नोंदणाऱ्याने विचारले, तुमची जात काय, आम्ही लगेच म्हटले हिंदु. तो 
म्हणाला,  पत्रकात भरायची आहे आम्ही म्हटले, हिंदुच.

आजही जिथे कुठे अर्जावर जात हा रकाना दिसतो तिथे आम्ही हिंदु असेच लिहितो.  

जातिभेद हा भारताला मोठा शाप आहे. सावरकर म्हणालेच आहेत, तुम्ही आम्ही सकल हिंदु, बंधु बंधु.