मला मराठी गाणी ऐकायला खुप आवडतात.
संदीप खरे यांची तर सगळीच. पण खास करून "कसे सरतील सये" हे गाणं.. या गाण्याशी एक आठवण जोडलेली आहे. जेव्हा मोबाइल ही तशी चैनीची वस्तू मानली जाइ तेव्हाची. माझ्या कंपनीतल्या मैत्रिणीने मला या गाण्याचा रिंगटोन दिला होता. तो ही मोनोटोनिक. ते म्युझिक ऐकुनच मी पार वेडी होउन गेले, आणि हे गाणं कसं मिळवायच हाच एक ध्यास लागला होता तेव्हा. आत्ता माझ्याकडे संदीप खरे यांची सगळी गाणी आहेत. 
तसेच मला आशा भोसले यांच "जिवलगा, कधी रे येशिल तु" हे गाणं ही प्रचंड आवडतं. हे गाणेही मी "युट्युब" वरून "व्हिडिओ" घेउन, त्यातून फक्त एम. पी.३ वेगळा काढून मिळवल.
"होतं असं कधी कधी " या सध्याच्या नवीन चित्रपटातिल "आयुष्याला त्या भेटुया" हे गाणे ही अप्रतिम. रोज घरी गेले की ४-५ वेळा ऐकतेच. 
हिंदी गाण्यांबददल बोलायचं तर, "अभी ना जाओ छोडकर" तसेच, "पिया बसंती रे" आणि "जिया धडक धडक जाये" ही गाणी माझी अतिशय आवडती आहेत.