विशेषतः पोरीबाळींना


पोरीबाळींना आवडणाऱ्या गोष्टी हिणकस दर्जाच्या असतात किंवा एकंदर पोरीबाळींना हिणकस, विरंगुळ्यासठी उत्तम , हलक्या दर्जाच्या गोष्टीच आवडतात असे आपल्याला म्हणायचे आहे काय? आणि मग व्यक्तिगत रोखाने केलेली विडंबने, दारू - व्यसने - मुलींवर / बायकोवर मारलेले शेरे , सवंग उल्लेख यांनी नटलेली विडंबनकाव्ये या गोष्टी लिहिणारी पोरंबाळं आणि त्या चवीने वाचून वर वाहवा करणारे ज्येष्ठ आदरणीय वगरे लोक यांची ही अभिरुची अगदी स्पृहणीय आणि प्रातःस्मरणीय मानायची काय?
 हा डिस्क्रिमिनेटिंग उल्लेख काढून टाकावा अशी माझी प्रशासकांना विनंती आहे.

--अदिती