विंदा करंदीकरांनी कवितेत हा प्रकार खूप वापरलाय. मला तो खूप जवळचा वाटतो. शिवाय मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे असा उच्चार तो कवितेत लोभस सुद्धा वाटतो.

हा प्रकार म्हणजे कुठला प्रकार? माझ्या मना बन दगड...सारख्या कविता का? ती बोलकवितेसारखी कविता आहे.

उदाहरणार्थ:

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!

इथे अष्टाक्षरीसारखे प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असायलाच हवीत असे बंधन नाही. समान मात्रा किंवा लगक्रम पाळण्याचेही बंधन नाही.

कधी कधी आशयाच्या प्रामाणिक अभिव्यक्तीला जर छंदामुळे आडकाठी येणार असेल तर कट्टर छांदिष्टांनी आशयाशी तडजोड करावी असं म्हटलं असलं तरी आशयासाठी छंदाशी खेळ करावा असं मला तरी वाटतं.
नक्कीच. दुमत नाही. शक्य झाल्यास उत्तम.