खूप चांगला विषय घेतला आहे चर्चेला... मला आवडला.
माझे एक ( एकच??? ) न्यून म्हणजे -
१)वेळेचे भान अजिबात नसणे...
२) कविता; गझल सुचली की कागद आणि पेन घेऊन तासन तास त्याच तंद्रीत असणे आणि (अर्थातच) अत्यावश्यक अशी अनेक कामे न करणे किंवा पुढे ढकलणे,
३) टीव्ही तर टीव्हीच पाहणे,
४) वाचत तर वाचतच बसणे,
५) रात्र रात्र जागत राहणे (वाचनासाठीच! ),
६) फटकळपणे, परखडपणे मते मांडणे, मते मांडताना आग्रही (कधी कधी दुराग्रहीही!!! ) असणे
७) पटले नाही तर; पटले नाही, असेच म्हणणे... समोरच्याला बरे वाटावे म्हणून उगाचच गोड गोड न बोलणे (हो, ही न्यूनेच म्हटली पाहिजेत आजकालच्या काळात...! )
८) बहुतांशी अंतरे राखणे... [ (भाग्य या शब्दाशीच वाकडे असल्याने 'राखावी बहुतांची अंतरे ' या रामदासोक्तीत आपोआपच बदल होतो आणि बहुतांचीऐवजी बहुतांशी हा शब्द तेथे येतो...:) ]
९) एखाद्यावर पटकन रागावणे (आपल्याकडून खरोखरच विनाकारण रागावले गेले आहे, असे लक्षात आले तर काही वेळाने त्याची क्षमाही मागणे... [ही खुबी [चांगुलपणा] म्हणता येईल का? :) :) :) ]
{रागावण्याविषयीचं हे महत्त्वाचं (आणि वारंवार प्रकट होणारं!!! ) न्यून या यादीत शेवटच्या क्रमांकावर टाकावं, म्हटलं! }
..........
अरे बाप रे! एक म्हणता म्हणता कितीतरी न्यूने सांगून झाली की! (...आणि आणखीही कितीतरी सांगायचीच राहिली आहेत!!! )
..........
... आणि हो, रस्ते तर अजिबात [(विशेषतः रात्री.... हां, हां, हां... गैरसमज नको!!! तसे काही नसते... :) ] लक्षात राहत नाहीत... मी स्वतःलाच याबाबतीत एक विशेषण लावून घेत असतो - रस्तांधळा!!!
असो...
सृष्टिलावण्या यांचे विशेष अभिनंदन.... काही किरकोळ 'कबुलीजबाबां 'ची संधी दिल्याबद्दल. :)