अमंत्रम् अक्षरम नास्ति नास्ति मूलमनौषधम् हा पाठ योग्य आहे. कृष्णकुमार म्हणतात तसा ..... अनौषधीम् असा नव्हे.

चैत रे चैत, तुझ्या म्हणण्याशी मी असहमत आहे. तू जे अनुष्टुभ छंदाचं लक्षण दिलं आहेस

अनुष्टुभ छंद तो ज्याला
एक नेम नसे गणी
अक्षरे चरणी आठ
देवा तार मला त्वरे

हे मराठी अनुष्टुभाचं आहे. संस्कृतात हा छन्द थोडा जास्त बांधीव आहे.

एका चरणात आठ अक्षरे यासोबतच "पंचमं लघु सर्वत्र" हा महत्त्वाचा नियम आहे.

अक्षरममंत्रम् नास्ति असं म्हटलं तर पाचवं अक्षर गुरू होतं आणि छंदोभंग होतो. असं संस्कृत काव्यात दिसणार नाही.