कृष्णकुमारजी, सुंदर अनुवाद केलेला आहेत.
मात्र जफा म्हणजे क्रौर्य नव्हे, तर कृतघ्नता किंवा तुमच्याच भाषेत द्रोह. सुरेख शब्द आहे द्रोह.
माझाही हा प्रयत्न पाहा.
न कृतघ्नता मी शिकली
न कृतघ्नता मी शिकली
न तिलाही प्रेम स्फुरले
मन वाहिले शिळेवर
झाली इजा मनासच
आपल्याच मोहऱ्हस्ते
मी नष्ट पुरता झालो
तक्रार करू कुठे मी
विनवू कुणास मी अन
हे सृष्टी-सृजनकर्त्या
पुसतो तुलाच मी हे
प्रेमास या जगी का
बदला कृतघ्नता ही
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८१०१७