आपण सामान्यतः असे गृहीत धरतो की, आपल्या समाजाचा समाज म्हणून ओळखले जाण्यासाठीचा पायाभूत गुणधर्म आहे तो तसा सर्वच समाजात असतो असे नाही. किंबहुना आपण एकाच वेळी विभिन्न समाजांचे घटक असतो आणि एखाद्या प्रश्नावरील त्या-त्या समाजाची भूमिका कधी कधी परस्पर भिन्नही असू शकते. उदा. मी एकाच वेळी टाटांच्या कंपनीतील कर्मचारी असल्याने त्या समाजाचा तर एका विशिष्ट जातीचा असल्याने (समजा शिंपी) त्याही समाजाचा आहे. आता गणपतीची सुट्टी अशा एखाद्या विषयावरून माझ्या दोन भूमिकांमध्ये मतभिन्नता निर्माण होऊ शकते.

अशा पेचप्रसंगाच्यावेळी मी कोणत्या समाजास माझ्या निष्ठा अर्पित करतो ते महत्त्वाचे ठरते. इस्लामसारख्या काही धर्मांमध्ये इस्लामी समाजाशी निष्ठा ही सर्वोच्च मानली गेल्याने (आणि अन्य पांथिक समाजाशी सहिष्णुता मान्य नसल्याने) त्या समाजात सर्वाधिक प्रमाणात असे वर्तन करणाऱ्या व्यक्ती दिसतात.

टीप : जर कोणी मराठी मुसलमान मनोगतावर असतील तरी कृपया या मुद्द्यांवर अधिक प्रकाश टाकावा.