कथा सुंदर आहे.

(खरं म्हणजे शेवट हाच अनपेक्षित धक्का होता. आत्ता कुठे एक खून झालाय. यापुढे खूप काहीतरी होईल[व्हेरोनिका, कॅराव्हॅन, सँटा कॅटालिना इ. इ.... ], खुनाचा शोध वगैरे लागेल असे वाटत असतानाच कथा संपली)

ही भावना माझीही झाली पण त्यामुळेच जास्त मजा आली.

यातील धक्का तंत्र खूप प्रभावी आहे. या एका गुणधर्मावरून ही ओ हेन्री ची कथा असावी की काय असे वाटले. मी वाचलेली नाही पण शक्य आहे असे वाटले. खलील जिब्रान हे सुद्धा अशा छोट्या रूपक कथा लिहितात मात्र माणसांच्या गोष्टी ते सहसा सांगत नाहीत. त्यामुळे ते नसतील असेही वाटते.