खूप वर्षांपूर्वी माझ्या लहानपणी मी चांदोबात अशी एक गोष्ट वाचली होती. चांदोबात चुटक्यासारख्या एक पानी गोष्टी येत असत. त्या एका पानात जवळ जवळ ४०% चित्र असायचे आणि त्याच्यावर एक गमतीदार चुटकेवजा गोष्ट.

गोष्ट अशी होती.

एका राज्यात लाचलुचपत वाढल्याने लाचखाऊ माणसांना देहान्त प्रायश्चित्त द्यायचे राजा ठरवतो! त्यासाठी एका न्हाव्याला नेमतो. लाचलुचपतीचे कैदी आले की न्हावी वस्तऱ्याने त्यंना मारून टाकत असे.

अशीच एकाला शिक्षा होते. त्याला मारताना न्हावी म्हणतो, मला शंभर रुपये दिलेस तर धारदार वस्तऱ्याने एका घावात मी तुला मारीन. नाही दिलेस तर बोथट वस्तऱ्याने टोचून टोचून मारीन.

ह्या गोष्टीची मला आठवण झाली.

धन्यवाद.