कृष्णकुमार... [ (आता आधीच कुमार असल्यामुळे राव, जी, साहेब... असे काहीही म्हणत नाही :) ती औपचारिकता 'कुमार'पुढे विजोड दिसेल... ]

नमस्कार...

तुम्ही माझे कौतुक केल्याबद्दल बरे वाटले मला... कौतुक कुणाला नाही आवडत? :) इतरांचं मनमोकळं कौतुक करणं हीही एक खुबीच... :)  धन्यवाद...

... पण खरंच अजूनही माझ्यातील खूप न्यूने सांगायची राहून गेली आहेत... पण माझी ही SSS ढीगभर न्यूने वाचून आणखी कुणाला 'न्यून'गंड यायला नको [(बाप रे! यांच्याकडे किती (किती) न्यूने आहेत; आमच्याकडे तेवढीही नाहीत, अशा अर्थाने :) ] म्हणून मी आवरते घेतले... नाहीतर यादी बरीच मोठी होईल...
... आणि वागताना-करताना शरम नाही वाटत, तर मग जाहीरपणे सांगताना कसली आली आहे लाज, म्हणून मग सांगून टाकली आपली मी माझी न्यूने जेवढी आठवली तेवढी!

स्वतःची न्यूने माहीत असणे ही एक खुबीच आहे.

हे वाक्य खूप आवडले... वेगळा दृष्टिकोन देणारे...

पुन्हा एकदा धन्यवाद...!