आजानुकर्ण,
तुमची काहीतरी गल्लत तर झालेली नाही ना? झालेलीच आहे बहुधा! :) किंवा माझा काहीतरी समजुतीचा घोटाळा झालेला असणार... :)
................
वरील कवितेतही पहिले कडवे वगळता इतर कडवी तीन ओळींचीच आहेत. :)
तुम्ही ज्याला पहिले कडवे म्हणत आहात, त्याला गाण्याच्या भाषेत मुखडा (आणि गझलेच्या भाषेत मतला [कुणी कुणी मथळाही म्हणतात :) ] ) म्हटले जाते... ते कडवे नाही.
मुखड्यानंतर लगेच ज्या ओळी येतात, ते (पहिले) कडवे...
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वरील कवितेत प्रत्येक कडव्यात तीन ओळी आहेत, हे खरे आहे; पण तिसरी जी ओळ आहे, ती रचनेच्या दृष्टीने आधीच्या दोन ओळींसारखी नसून मुखड्याला जोडण्यासाठी म्हणून आलेली आहे.... (आणि आपण जी असंख्य मराठीऱ्हिंदी गाणी आकाशवाणीवरून रोज ऐकत असतो, ती बहुतांश अशाच रचनाबंधातील असतात... 'हम से आया न गया, तुम से बुलाया ना गया... ' किंवा 'मन पिसाट माझे... ' सारख्या रचनाबंधांसारखी गाणी क्वचितच... )
'मज श्यामसुंदरा तुझा लागला रंग.. ' आणि 'काहीतरी सुचेल नवे आज' या रचनांमध्ये
कडवे तीन तीन ओळींचे आणि मुखड्याला जोडणारी आणखी एक ओळ असे (३ + १ असे चार ओळींचे ) आहे.. मात्र, 'चांदण्यापलीकडून कोण... 'ही जी रचना आहे, तीत कडवे दोन दोन ओळींचे (मराठीऱ्हिंदी गाण्यांसारखे) आणि मुखड्याला जोडणारी ओळ असे (२+ १ असे तीनच ओळींचे) आहे... हा रचनाबंध काही नवा नाही... पारंपरिकच आहे...
माझा समज असा झाला होता की, तुम्ही 'श्यामसुंदरा' आणि 'काहीतरी सुचेल... ' या रचना डोळ्यांपुढे ठेवूनच विचारत आहात... की - तुमच्या बऱ्याच कविता या ३ ३ ओळींच्या कडव्यांमध्ये लिहिलेल्या असतात. या प्रकाराला काही विशेष नाव आहे का? - म्हणून ...
म्हणून मग मी लांबलचक लिहायची संधी साधून घेतली... :)
पण आता पटले का तुम्हाला, मी काय म्हणतोय ते? :)