अभिजित, तुम्ही फारच सुंदर लिहिले आहे. मीसुद्धा बिग बॉसबद्दल ऐकले आहे. पाहायचा योग सुदैवानी आला नाही. (मी सद्ध्या अमेरिकेत आहे)  मात्र  वरून दट्ट्या कुणी आणला ते कळले तर बरे होईल.

या आणि सद्ध्याच्या अश्याच मालिकांबद्दल ऐकले किंवा त्या बघितल्या तर जाणवते की पूर्वीच्या मालिका किती चांगल्या होत्या. मला अजूनही कथासागरमधल्या अनेक कथा आठवतात. परवाच मला यु ट्युबवर विक्रम-वेताळही सापडली. माझ्या मुलींना खूप आवडली.

मला एक प्रश्न पडतो की प्रेक्षकांना काही कळत नाही असे निर्माते समजतात की प्रेक्षकांचीच अभिरुची हीन झाली आहे?