नुकताच माझ्या ओळखीमधील एकाला जेट एयरवेज कडून विदारक अनुभव आला.
जेट च्या आंतरराष्ट्रीय सेवान्मध्ये न्यूयोर्क व टोरंटो पासून दिल्ली व चेन्नाइ हि उडाणे मार्गे (व्हाया) ब्रुसेल्स होतात. माझा मित्र प्रवास करून चेन्नाइ येथे उतरल्यावर त्याला सामान आले नसल्याचे लक्शात आले. त्याच बरोबर आणखी ४ जणांचे हि सामान आले नव्हते. तेन्व्हा त्याने पद्धतशीर तक्रार नोंदवली आणि जेट कर्मचार्यान्नी त्याला सामान परत करन्याचे आश्वासन वगैरे दिले. तेथे अधिक माहिती अशी कळाली कि गेल्या काही महिन्यान पासून दररोज प्रत्येक लॅंडींग नंतर किमान २-३ जणांचे सामान गहाळ होतेय ( त्यामुळे तुमचे झालेय यात काही मोठी गोष्ट नाहीये.) सामान गहाळ होण्याचे खापर त्यानी ब्रुसेल्स येथिल सामानाची चढ उतार करणार्या कर्मचार्यान्वर फोडले, आणि काळजी करू नका, सामान ४ दिवसात घरी येइल असेही सान्गितले.
त्यानंतर महिनाभर झाला तरी अजून त्याचे सामान आलेले नाहीये हे पाहून जेट वाल्यानी त्याला भरपाइ देउ असे सांगीतले व त्याच्याकडून हरवलेल्या सामानाचा तपशील घेतला. (सुदैवाने त्याच्या सामानात अति किमती वा इलेकट्रोनिक सामान नसल्याने व फक्त कपडेच असल्याने भरपाई चि रक्कम कमीच होती.) त्यानन्तर जेट वाल्यानी त्याला कपड्यांच्या सर्व पावत्यान्ची मागणी केली. आता, खरेदी केलेल्या कपड्यांच्या पावत्या आपण जास्त दिवस सांभाळून ठेवत नाही, पण त्याचा हा मुद्दा विमान कंपनी ला मान्य नाहिये. दरम्यान सुटी संपल्याने तो परत परदेशी गेला, त्यामुळे आता तो त्याचे सामान अक्कलखाती जमा करायचा विचार करत आहे.