भीमरूपीतली पहिली ओळ "गालगागा लगागागा गालगागा लगालगा" अशी असली तरी  अनुष्टुभ् छंदातल्या सर्वच काव्यांतल्या सर्वच ओळी तशाच असतील असे नाही.  अनुष्टुप् हा छंद आहे, हे काही मात्रा किंवा गणवृत्त नाही. उदाहरणार्थः यदा यदा हि धर्मस्य । ग्लानिर्भवति भारत ।। इथे,  लगालगा लगागाल गागालल लगालगा असे असल्याचे दिसते आहे.  पण येथेदेखील प्रत्येक ओळीत पाचवे लघु आणि सहावे गुरु आहे, आणि दुसऱ्या आणि चौथ्या (ग्लानिर्भवति भारत, आणि, तदात्मानं सृजाम्यहम्) ओळींतले सातवे लघु आहे. म्हणजे अद्वैतुल्लाखानांनी वर सांगितलेली लक्षणे योग्य दिसताहेत. मराठी उदाहरण: जिजाई आमुची आई, शिवाजी आमुचा राणा (चू. भू. द्या.घ्या.)