शुद्धलेखनाचा बाऊ असतो?  इंग्रजी स्पेलिंगचा जर बाऊ वाटत नाही तर मराठी शुद्धलेखनाचा का वाटावा?  आज दूरदर्शनवर अनेक हिंदी वाहिन्या आहेत, त्यातल्या एकातरी वाहिनीवर चुकीच्या रीतीने लिहिलेला एकतरी शब्द दाखवावा आणि मग विचार करावा, की मराठीचे असे का होते? जर हिंदी वाहिन्यांवर अचूकच हिंदी दिसते तर मराठी वाहिन्यांवर का नाही?  याचे कारण असे आहे की मराठी वाहिन्यांचे मालक, निर्माते आणि कर्मचारी अमराठी आहेत.  जे मराठी आहेत ते फक्त तंत्रज्ञ.  थोडे मराठी संगणक ऑपरेटर असतील तर ते मुळात मराठी कधी मनापासून शिकलेलेच नाहीत. कार्यक्रमाचे संचालन करणारे इतके घाणेरडे मराठी बोलतात की त्यांची दया येते.  या संदर्भात, रविवार १२ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये "मी तुमचे खूप खूप धन्यवाद करते" या नावाचा चंद्रकांत काळेंचा लेख जरूर वाचावा. महाराष्ट्राला मराठीवर प्रेम करणारे सरकार कधी मिळालेच नाही, आणि मिळण्याची अजिबात शक्यता नाही.--अद्वैतुल्लाखान