प्रशासकांना हे सर्व जाहिर रीत्या लिहिण्याची वेळ यावी हेच दुर्दैवी आहे.  कुटुंबप्रमुखाचा वेळ जर लहान 
मुलांची बालिश भांडणे सोडवण्यातच जाऊ लागला तर कुटुंबाच्या विकासाकडे तो पाहणार कधी?  

समर्थ म्हणतात,  मना बोलणे नीच सोशीत जावे.  पण हे सोसायचे तरी किती?  एकवेळ माणसाला सोसायचा कंटाळा 
येईल पण नीच लोकांना स्वत:च्या वागण्याशी शिसारी येणार नाही.  खरोखरच दुर्दैवी आहे हे सगळे.