वृकोदर,
जातीचा विषय ह्या चर्चेत अनाहूतपणे आला आहे. त्याला अजून खतपाणी घालू नये ही विनंती.
अमेरिका आणि ब्रिटन ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत. अनेक शतके त्यांची संस्कृती वेगळी वाढलेली आहे.
हे तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं, तरी -
मराठीचे तसे नाही.
हे तितकसं पटण्यासारखं नाही. गावागावात मराठीच्या वेगळ्या वेगळ्या छटा बघायला मिळतात. अजून देशाच्या विविध कोपर्यांमध्ये स्थलांतर केलेल्यांचं मराठी तर आणखीनंच वेगळं.
तेंव्हा सर्वानुमते आपण इथून पुढची वाटचाल करायला काय हरकत आहे?