दोन तीन तासापोऊर्वी मी हा लेख वाचायला घेतला तेव्हा वाचवत नव्हता. त्यात परिच्छेदच नव्हते. शिवाय अवतरण चिन्हेही विजोड होती.
आता लेख अगदी उत्तम दिसत आहे.
असो.
अभिरुची उच्च असेल, तर तुमचा विचारही तितकाच परिपक्व असतो. यातून निर्माण होणारी कलाकृती ही परमोच्च आनंद देणारीच असते.
हे पूर्ण खरे नाही.
म्हणजे विचार परिपक्व व्हायला अभिरुची उच्च असाय्लाच हवी. पण केवळ अभिरुची उच्च असल्याने विचार परिपक्व होतातच असे नाही. (टोकाचा विचार केला तर केवळ दुसऱ्याची नक्कल करून किंवा सतत उच्चा अभिरुचीच्या माणसांत वावरल्याने अभिरुची उच्च होईलही; पण विचार परिपक्व व्हायला तशी कुवतही हवी.)
असो.
अजय अतुल ची कारकीर्द वैभवशाली ठरो ही हार्दिक शुभेच्छा.
-श्री. सर. (दोन्ही)