सहज गंमत म्हणून संस्कृत शब्दकोश उघडला.  त्यात श्लोक या शब्दाचा अर्थ गीत  किंवा पद्य असा दिलेला दिसला. श्लोक हे एका छंदाचे नाव आहे असा उल्लेख तिथे अजिबात नव्हता.  व्याकरणाचे पुस्तक काढून पाहिले त्यात अनुष्टुभ्‌ किंवा श्लोक याची लक्षणे देताना पाचवे लघु एवढेच सांगितले आहे.  आणि पुढे पुस्ती देऊन हे लक्षण न पाळलेली अनेक उदाहरणे रामायण-महाभारतात आहेत असे म्हटले आहे.   म्हणजे श्लोक आणि अनुष्टुभ्‌ एकच आहेत असे दिसते. आणि या रचनेत कवीला थोडेफार स्वातंत्र्य असावे.