जिथे स्वकर्तृत्वावर असलेला विश्वास डळमळायला लागतो तिथे कुठल्या ना कुठल्या आधाराची गरज पडते. ती गरज कधी ज्योतिषातून उपाय काढून पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो तर कधी देवाला शरण जाण्याने तोडगा निघेल असे वाटून तसे करण्यात होतो. कधी आणखीन जास्त सडेतोड स्व-अभ्यास करून तर कधी आणिक कशातून. डीएनए पेपरबद्दल माझे काही खास मत नसले तरी वर दिलेल्या त्यातील बातमीच्या उदाहरणातून भल्याभल्या व्यक्तींचा विश्वास डळमळतो हे पाहून आश्चर्य तर वाटलेच पण वाईटही वाटले. पंढरीच्या वाऱ्यांमधूनदेखील तरूणांची वाढती संख्या हाही नुसता चर्चेचा नाही तर गहन विचाराचा विषय होऊ शकतो असे माझे प्रामाणिक मत आहे.