इतके स्त्रीधार्जिणे कायदे असूनही प्रत्यक्षात अजूनही स्त्रीचा छळ, स्त्रियांवर सामुहिक बलात्कार का घडतात.....
सहमत..
आईबाबांना संभाळणे - जिथे फक्त मुलीच आहेत तिथे आईबाबा मुलीनी सांभाळलेले कसेतरी चालवून घेतात, पण जिथे मुलगा आणि मुलगी आहे तिथे आईबाबा स्वतःच मुलीजवळ राहणे कमीपणाचे समजतात आणि त्यांना 'मुलगा असुनही मुलगी सांभाळतेय' हे स्विकारायला प्रचंड जड जाते. आईबाबा आणि मुलगी दोघेही त्यामुळे प्रचंड मानसिक तणावाखाली राहतात...
सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा हक्क नाही. - हा कायदा स्त्रीधार्जिणा कसा ठरतो?
मुलाच्या संपत्तीवर वडीलांचा हक्क आहे. - ह्याचा फायदा जावयाला मिळणार असा निष्कर्ष काढणे याला बादरायण संबंध म्हणतात. आणि जर जावयाला मिळालाच तर मग हा कायदा स्त्रीधार्जिणा कसा ठरतो?
मग अशा वेळेस अश्या कायद्यांमुळे "पैशांनी गरीब" असलेल्या वडिलांच्या मुलीशी कुणी लग्न करणारच नाही! - ते तर या कायद्यांच्या आधीही कुणी करायला धजावत नव्हते. ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्याशी सोयरीक जुळवून स्वतःच्या गळ्यात खर्चाची धोंड कोण बांधून घेईल? कायद्याला लोक घाबरायला लागले तर मग समाजातून सगळे गुन्हे हद्दपार होतील.
जर मुलगा आणि मलगी समान आहेत तर घटस्फोट घेतांना फक्त पतीनेच पत्नीला का पोटगी द्यावी? - पती बहुतेक वेळा मुलांची जबाबदारी पत्नीच्या गळ्यात टाकून मोकळा होतो, त्या मुलांना घटस्फोटित पत्नीने एकट्यानेच सांभाळावे? शिवाय पोटगी किती मिळते त्याची चौकशीही करावी.
हल्लीच एका निकालात पतीला पोटगी द्यावी असा न्यायालयाने आदेश दिला असल्याचे पेपरात वाचले.
मानसिक छळ वगैरे दोन्ही बाजुने होतो. कायदा कसाही असो, स्त्रीधार्जिणा किंवा पुरूषधार्जिणा - त्याचा दुरूपयोगच झालेला दिसतो, ज्यांना खरी गरज असते, त्यांना कित्येकदा असा कायदा आहे हेच माहित नसते.
साधना