जर मुलगा आणि मुलगी समान आहेत तर घटस्फोट घेतांना फक्त पतीनेच पत्नीला का पोटगी द्यावी?
तुम्ही थोडा विचार करायला हवा. समजा एखाद्या स्त्रीला अर्थार्जनासाठी काहीही तरतुद नसेल. तर एकतर तिला समाजाच्या अथवा नातेवाईंकाच्या मेहरबानीवर अवलंबून राहावे लागेल. समाज किती निष्ठुर असतो हे वेगळे सांगायला नकोच. कदाचित तिला अश्या परिस्थितीतून वेश्यासारख्या व्यवसायातही जावे लागेल. बरे, वेश्या व्यवसायातही वयाचे बंधन आलेच. अन्यथा मोलमजुरी करून पोट भरणेही किती अवघड आहे. ( माझ्याडोळ्यासमोर कनिष्ठवर्ग आहे.)
दुसरी बाजू म्हणजे सर्वसाधारणपणे अर्थार्जन पुरुष करत असतात, स्त्रीया पुरक गोष्टी करत असतात. अश्या वेळेस स्त्रीयांनी आर्थिक मोबदला / पोटगी मागितली तर काय चुक आहे?