माणसाने एखादे कार्य सिद्धीस जावे म्हणून तार्किक दृष्टीने शक्य ते सर्व प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट यशस्वी होत नाही. असे अनेकदा होते. मला अस वाटत की अशा वेळी मानसिक आधारासाठी देवासारख्या संकल्पनेचा आधार घेतला तर काही वाईट नाही.
ही वैज्ञानिक मंडळी त्यांचे काम न करता नुसते शुभ दिवस आणि तिरुपतीच्या वाऱ्या करत असतील तर मला तो अवैज्ञानिक दृष्टीकोन आहे असे वाटते. पण तसे नसेल तर ती त्यांची श्रद्धा किंवा एखादी परंपरा म्हणून त्याकडे बघायला काय हरकत आहे? (तिरुपती उदा. म्हणून घेतले आहे)वैज्ञानिक शेवटी माणसे आहेत आणि त्यांची कशावर श्रद्धा असूच नये असे शक्य होईल असे वाटत नाही. इथे अंधश्रद्धा आणि श्रद्धा यात गल्लत होऊ नये एवढे मात्र नक्की. ( आजवर संशोधन क्षेत्रात असणाऱ्या जेवढ्या व्यक्ती आहेत त्यापैकी जवळ जवळ सगळ्या अमूक केले तर अमूक होते.. असे काही सांगितले असले की नक्की होते का? खरे की खोटे असे पडताळून बघतात असा अनुभव मला आला आहे. त्यामुळे या गटात श्रद्धाळू असतील पण अंधश्रद्धाळू असणे अवघड वाटते)
माणसे पराकोटीची सश्रद्ध किंवा अगदी नास्तिक उगीच होत नाही. त्यामागे काही प्रबळ कारणे असतात असे मला तरी दिसले आहे.
((वर्तमानपत्रात काय आले आहे ते मी वाचले नाही,त्यात किती तथ्य ते पण माहिती नाही... कदाचित काही वैज्ञानिकांचा या मुहूर्त बघण्याला, प्रतिमा अर्पण करण्याला विरोधही असेल. ))
या विषयावर चर्चा जरुर करावी. त्याने फार काही बदल होईल/ बिघडेल असे नाहीचः)