तुम्ही ज्या पद्धतीने अमेरिकन निवडणुकांची माहिती देत आहात ती पाहून अतिशय समाधान वाटते. ह्यातल्या कित्येक गोष्टी मी वाचत असतो पण मला सगळ्या समजलेल्या असतीलच असे नाही. आता कुणाला विचारले तर त्यालाही एवढे प्राथ्मिक काय सांगायचे असे वाटेल. पण तुम्ही भारतातला वाचकवर्ग डोळ्यापुढे ठेवून अतिशय सोप्या भाषेत हे सगळे सांगत आहा त्याचा मला उपयोग होईल. (उदा हे एलेक्टोरल कॉलेज, प्लूरल व्होट हे सगळे मला नीट कळलेले नव्हते. आता कळले. ) मला वाटते कित्येक भारतीय जे आता अमेरिकेत गेली काही वर्षे आहेत (मतदार नाहीत) त्यांनाही ह्यातली कितीतरी माहिती उपयोगी पडेल. (जे मतदार असतील त्यांना माहीत असेल. त्यांनीही आणखी माहिती प्रतिसादातून दिली तर चांगले होईल.)

सावकाश झाले तरी जालेल पण अशीच माहिती देत जा असे मी सांगेन.

धन्यवाद.

पुढील भागांसाठी शुभेच्छा.