मयुरेश,

तुम्ही पोटतिडकीने लिहिलेल्या पत्रातल्या बहुतेक भावनांशी सहमत आहे.  उत्तर भारतीय माध्यमांनी महाराष्ट्र आणि राज ठाकरे यांच्याबाबत संयमाने बातम्या द्याव्यात.

उदा. ही बातमी पाहा.   दुवा

इथे श्री. ठाकरे यांचा उल्लेख 'क्रिमिनल टर्न्ड पॉलिटिशिअन' असा धादांत खोटा केला आहे. श्रीकांत ठाकरे यांच्यासारख्या संगीतकाराचा हा सुसंस्कृत मुलगा आहे. ज्याला साहित्य, कला यांमध्ये रुची आहे. अशा राजकारण्याबद्दल बोलताना 'पटना डेली' वाल्यांनी चुकून बिहारी राजकारण्यांबद्दलचे नेहमी वापरले जाणारे विशेषण वापरले आहे.