कमाल आहे ! आबा भलतेच पेटून उठलेले दिसतात ! लगोलग अध्यादेशही जारी करून टाकला ! ह्याला म्हणतात १०० चुहे खाके बिल्ली चली हज को ! कल्याणच्या हल्ल्याबद्दल  इतक्या बातम्या... वाशीत शिवसेनेने केलेल्या मारहाणी बद्दल कोणीच बोलत नाहीये !

मनसेच्या हल्ल्याबाबत  वृत्त दाखवताना फुटेज मात्र शिवसेनेच्या वाशी हल्याचे दिसत होते. ज्या परीक्षार्थीचा कथित हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत, त्याचा मृत्यू भाईदराला जाताना ट्रेन मधून पडून झाल्याची पोलिस स्टेशनमध्ये नोंद आहे. मीडिया कित्ती खालच्या थराला जाऊ शकतो !