राज ठाकरेंना, मराठीच्या मुद्द्यावर बाळ ठाकरेंचे समर्थन मिळणे अशक्य आहे.

एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे. ९२ च्या दंगलीनंतर शिवसेनेने "हिंदुत्वाचा मुद्दा" डोक्यावर घेतला. आणि त्यानंतर शिवसेनेचे राजकारण पुर्णपणे भरकटले. बाळ ठाकरेंनी "हिंदुत्वरक्षणाची" जवाबदारी मराठीमाणसाच्या डोक्यावर टाकली. त्यातच स्वतः युती करून बसलेत. मुंबईत मुळात व्होटबँक नेहमीच ठरलेल्या होत्या. मराठी-शिवसेना, गुजराथी-भाजप, आणि मुसलमान, भैय्ये व इतरांची मते काँग्रेसला. ह्यापैकी, मुसलमान युतीकडे येणे शक्यच नव्हते. अश्यांवेळी, भैय्येही एकमेव व्होटबँक काँग्रेस व युतीला हवी होती. त्यासाठी, त्यांच्या अनधिकृत झोपड्या वाढवून वोटबँक निर्माण करणे हा काँग्रेसचा जुनाच डाव.

ह्यावर कहर म्हणून शिवसेनेने मोफत घरांची योजना आखली. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ९२ नंतर भैय्यांची मोठ्यासंखेने मुंबईकडे कुच सुरू झाली. मुंबईतल्या झोपड्या ह्या तसे पाहिलेतर पालिकेची जवाबदारी. पालिकेत गेली अनेक वर्ष "युतीच" आहे. आणि प्रचंडप्रमाणात भैय्यांच्या झोपड्या मुंबईत "हिंदू व्होटबँकेच्या" नावाखाली  "युतीनेच" वसवल्यात आणि त्यांना "प्रोटेक्शन" दिले. ह्यात शिवसेनेच्या अनेक नगरसेवकांकडे गाड्या आल्यात, बंगले झालेत, मुंबई बकाल होत असताना मातोश्रीचे "रोनोवेशन" झाले !

मराठी मराठी करत, शिवसेनेने आजवर मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान केले आहे. शिवसेनेकडे "आशा" म्हणून बघण्यात जस्ताच नुकसान होईल.

मयुरेश वैद्य.