गोष्ट मस्तच आहे. खिडकीसाठीची अशीच भांडाभांड माझ्यात आणि माझ्या लहान बहिणीत झाली होती. "इतका वेळ तू बसलीस, आता अर्धा तासच उरलाय तेव्हा आतातरी मला बसू दे. " असे मी तिला म्हणाले आणि कारच्या खिडकीशेजारी बसले.बसून जेमतेम ५ मिनिटे झाली असतील-नसतील तर खप्पकन् डाव्या डोळ्यावर शेजारून जाणाऱ्या काळीपिवळीच्या टायरमध्ये अडकून अचानक सुटलेला दगड बसला. "आई गं! " म्हणून मी बेशुद्ध ! पुढची सगळीच कहाणी अत्यंत दारूण आहे. आता मागे वळून बघते तर त्या घटनाक्रमाचे कौतुक वाटते मला. जे दुःख मी सहन केले तेच सहन करताना छकुलीला अजिबात बघवले नसते मला. जे होते ते भल्यासाठीच, म्हणतात ते काही खोटे नाही.