अमिताभ बच्चन यांच्या आजारपणाचा (आणि तदनुषंगिक घडामोडींचा) संबंध या विषयाशी नाही, त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही.

कसा नाही?  पूजाअर्चा आणि नवस हे कोणत्याही कारणासाठी कोणीही केले तर जेवढे समर्थनीय तेवढेच वैज्ञानिकांनी आणि शाळेतल्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी चंद्रारोहणासाठी केलेले..  काही झाले तरी त्यांची आणि सामान्य जनेतेची संस्कृती एकच आहे.  गंमत अशी की जेव्हा मशिदी-दर्ग्यात आणि चर्चेसमध्ये प्रार्थना होतात त्याच्याबद्दल कुणी अवाक्षर काढत नाही.  हज यात्रेबद्दल बोलायची कुणाची हिंमत आहे?  अशी माणसे पंढरपूरच्या वारीबद्दल काहीच्या बाही बोलतात.  यात्रा हा हिंदू आणि मुसलमान संस्कृतींचा  एक अंगभूत हिस्सा आहे.  यात्रेत धार्मिकतेपेक्षा बंधुभावप्रसार आणि समाजअध्ययन हे अत्यंत महत्त्वाचे आंतरिक हेतू असतात.

जी माणसे आयुष्यात आपल्या बोलण्यात "देवाशपथ, अरे माझ्या देवा, सोडव रे देवा, दैवी देणगी,  या अल्लाह, दैवदुर्विलास, गणपती बापा मोरया"  असले प्रयोग म्हणत नाहीत त्यांनी वैज्ञानिकांना नावे ठेवावीत.