ब्रिटन हे महाराष्ट्रापेक्षा छोटे राष्ट्र आहे. तिथेही अनेक भागात वेगवेगळ्या उच्चाराची इंग्रजी बोलली जाते. cockney,  आयरिश, स्कॉटिश असल्या अनेक छटा आहेत. पण कुणी आपापल्या ऍक्सेंटकरिता वेगळे स्पेलिंग मागितले आहे का? Queen's English हेच प्रमाण मानतात.
मग मराठीत असे का नसावे? गावागावातील मराठीतील छटा असतील पण म्हणून गावागावाची लेखी भाषा वेगळी बनवायची का? लेखी माध्यम हे जास्त formal असते आणि बोली माध्यमापेक्षा जास्त sophisticated असते. त्याकरिता अक्षरओळख तरी लागतेच. त्यामुळे असे माध्यम जास्त नियमबद्ध असणारच. सगळ्या भाषांत असे आहे मग मराठीत का नसावे?

आता जातीयवादाबद्दल. शहामृगासारखे वाळून तोंड खुपसून बसल्याने हा मुद्दा नष्ट होणार नाही. विविध राजकीय नेते आणि लेखक हा मुद्दा वारंवार उपस्थित करतातच. पूर्वीच्या काळात ब्राह्मण जास्त प्रमाणात शिकलेले असल्यामुळे त्यांचा भाषेवर जास्त प्रभाव आहे हे तर खरेच. पण म्हणून त्यांनी केलेले ते सर्व चूक आणि त्या भाषेचे नियम पाळणे म्हणजे बामणांची गुलामगिरी हे समीकरण मला पटत नाही.