कडवा चौथ हा बायकांचा सण.  त्या दिवशी नवऱ्यांनी घरी हजर राहणे हा त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. (उत्तर हिंदुस्थानात बायकांचे होली आणि कडवा चौथ हे दोनच सण आहेत, असे हिंदी सिनेमाने सिद्ध केले आहे!)  वर्षातून फक्त एकदाच येणारे कडवा चौथ आणि भाऊबीज हे सण.  त्यांचे महत्त्व वादातीत आहे. चार दिवसांवर भाऊबीज आली असताना पुढे ढकलता येण्यासारख्या विदेशवारीला कुठला मराठी भाऊ जाईल ?