"टाटांची नॅनो महाराष्ट्राला हुलकावणी देऊन गुजराथाला निघून गेली.  "
खरं आहे!   विलासरावांच्या नाकर्तेपणामुळे  हे झालंय. नॅनो गुजरातला जाण्या आधी काही पत्रकारांनी त्यांना महाराष्ट्रात नॅनो प्रकल्प  आणण्याबाबत विचारले असता ते म्हणाले होते,  " आधी त्यांचा ( टाटा-बंगाल )  घटस्फोट तरी होऊद्या मग बघू कोणती मुलगी दाखवायची ते. "  हे घटस्फोटाची वाट बघत बसले  आणि तिकडे मोदींनी बाजी मारली.


राज ठाकरेंच्या अटकेनंतर आपण रेल्वेभरतीबद्दलही तितकेच आग्रही आणि मराठी हितसंरक्षणासाठी काही घोषणा केली असती, तर आम्हाला तुम्ही आमचे आणि ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वाटला असता.

अगदी बरोबर!   पण दिल्लीच्या हुकुमांवर  नाचणाऱ्यांना  काय म्हणावे?

आज महाराष्ट्राला मोदींसारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. हेच खरे.

मयुरेश, हे  पत्र विलासरावांच्या पर्यंत पोहचवा.

अजय