पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त असेल तर पतीला पोटगीचा दावा करता येतो.

सुनेला सासऱ्याच्या संपत्तीत वाटा नाही, म्हणजे सासऱ्याने कमावलेल्या संपत्तीत नाही. जी संपत्ती पतीची वडिलोपार्जित असेल, म्हणजे पिढ्यानुपिढ्या चालत आलेली त्यात सुनेला वाटा असतो. (तसेच जावयालाही. ) पण एखाद्या मनुष्याने स्वतः कमावलेली संपत्ती मृत्यूपत्र नसेल तर त्या मनुष्याचा जोडीदार व अपत्ये यांच्यात (फक्त) वाटली जाते.

बाकी, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणे आईवडिल स्वखुशीने करतात असे वाटते. त्यात मुलांचा पगार वापरायला मिळावा असा गुंतवणुकदारासारखा हेतू नसावा.