सरकारबद्दल हा राग बहुतेक सर्वच मराठी माणसांमध्ये आहे! आता फक्त आपली "मराठी व्होट" बँक निर्माण करून ती सर्व शक्तीनिशी राज ठाकऱेच्या मागे "सशर्त" उभी राहिली पाहिजे.
आजही, मराठी मते हि शिवसेना-मनसे मध्ये विभाजित झालीत तर त्याचा फायदा पुन्हा ह्या भैय्यांनाच होणार आहे. मागच्या पालिका निवडणूकीत "युती" कशीबशी जिंकली. आणि त्यात मराठी मतांचा फार मोठा वाटा होता. अर्थात शिवसेनेला त्याचा लागलीच विसर पडला ( गेल्या अनेक वर्षात शिवसेना सत्तेत असलेल्या पालिकेने साधा एक रस्ताही भैय्या-फेरीवाला मुक्त केला नाही), भाजपला मराठी मतांशी फारसे काही देणेघेणे नाहीच. अशावेळी मराठी माणसाने जात-पात विसरून एकत्र येऊन स्वतःची अशी व्होटबँक निर्माण करण्यातच आपले भले आहे.
मराठी माणूस ब्राह्मणसभा, वेगवेगळ्या संस्था, कट्टे, सभा, सार्वजनिक मंडळे इ. इ च्या नावाखाली एकत्र येतोच, ह्याचाच फायदा आपली स्वतःची अशी व्होटबँक निर्माण करण्याकरता सहज शक्य आहे. अन्यथा एकटा राज कितीही बोंबाबोंब करो काहीही फायदा होणार नाही.
सशर्त : मराठीच्या मुद्द्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही मुद्द्याचे "ओझे" न वाहणे.
मयुरेश वैद्य.