तुमचा लेख संपूर्ण वाचला आणि फारच उत्कृष्ठ वाटला.  शेवटच्या एका मुद्द्याबाबत माझं मत खालीलप्रमाणे.

आता संगणकांच्या आगमनामुळे मराठी भाषा मागे पडू नये असे वाटत असेल तर शुद्ध-लेखनाची व्याप्ती 'भाषेच्या-संगणकीय-वृत्तीपर्यंत' नेता आली पाहीजे.

हे म्हणणं म्हणजे घोड्यापुढे टांगा बांधण्यासारखं आहे असं मला वाटतं.  कारण वरील विधानाचा दुसरा अर्थ असाही होतो की शुद्ध-लेखनाची व्याप्ती 'भाषेच्या-संगणकीय-वृत्तीपर्यंत' नेता आली तर मराठी भाषा मागे पडणार नाही.  पण खरं तर याउलट मराठी भाषा संगणकीय-वृत्तीशिवाय इतरत्र जेवढी जास्त वृद्धींगत होईल तेवढी शुद्धलेखनाची व्याप्ती आपसूकच संगणकीय-वृत्तीपर्यंत पोहोचेल.  जसं चीनमधे किंवा जपानमध्ये झालं की त्या भाषा आधीच एवढ्या समृद्ध होत्या की त्या भाषा संगणकातून लिहिता येण्याची सोय ही तिथल्या व्यवहाराची निकड होती. संगणकीय-वृत्तीमुळे या भाषा समृद्ध झाल्या नाहीत तर त्या समृद्ध असल्यामुळे आपसूकच संगणकीय-वृत्तीपर्यंत पोहोचल्या.  मराठी दुर्दैवानी अजून एवढी समृद्ध नाही की व्यवहारात तिची गरज निकडीची ठरेल आणि ती आपसूकच संगणकीय-वृत्तीपर्यंत पोहोचेल.