सुशिक्षित लोक देखील कसे वाहात जातात हे पाहून आश्चर्य आणि वाईट वाटले.

एका प्रश्नाचे उत्तर सर्वांनीच आपल्या स्वतःला द्यावे... महाराष्ट्र भारतापेक्षा मोठा आहे का? माझी प्रादेशिक अस्मिता माझ्याच राष्ट्रीय अस्मितेच्या विरोधात आहे का?

'राज' यांचा मुद्दा बरोबर असला तरी देखील कृती निश्चित पाठिंबा द्यावा अशी नाही. व्होटबँक नावाचा अत्यंत अश्लाघ्य प्रकार काँग्रेसी संस्कृतीने रुजवला , वाढ्वला आणि आपल्या मतांची पोळी भाजून घेतली. आता इतरांनी त्यांचाच मार्ग अनुसरल्यावर साळसूदपणाचा आव आणून गंमत पाहत बसले आहेत.

या असल्या प्रादेशिक, भाषिक , जातीय , अस्मितांचा सुजाण भारतीयांनी निषेध केला पाहीजे. आणि सर्वांनी मिळून  कॉमन शत्रुचा (दहशतवाद, अनारोग्य, गरीबी, साक्षरता ) विऱोध  केला पाहीजे, वयं पंचाधिक शतम !

यात गुन्हा आहे विकासाचा असमतोल करून सर्व प्रकारचे 'वाद' चिघळत ठेवणाऱ्या कॉग्रेसी ( कारण तेच अधिक काळ केंद्रात सत्तेत होते ! ) संकृतीचा आणि त्यात वाढलेल्या ( भले इतर पक्षातील असले तरीही) सत्तालोलुप राजकारण्यांचा आहे.

बिहारचा विकास न करणाऱ्या लालू, मुलायम, मायावती, पस्वान , नितिश  यांना ठोका की! त्यांना महाराष्ट्र बंद करा,  गरजू नोकरी मागणाऱ्यांना मारून काय मिळणार ? आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी!!!

असले अभिनिवेश कोणाचाच विकास करत नाहीत, केवळ मतांचे राजकारण होते आणि राष्ट्राचे नुकस्सन ( म्हणजे , तुमचे- माझे सर्व करदात्यांचे! ) होते. भारताच्या नुकसानात महाराष्ट्राचा विकास कसा होईल?